Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

Kushavati Marathi

कुशावती

पुरा विधात्रा रघुनाथसेवां करिष्यमाणेन कुशाम्बुबिंदुना |
विनिर्मिता सात्र सरित्वारा वने कुशावतीं तां प्रवदन्ति सूरयः ||२३||
(तृतीय स्थबक, श्री गुरुपरंपरामुतम्)

भविष्यात श्रीरामदेवाची सेवा व्हावी या उद्देशाने निर्माता ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतील कुषोदक बिंदूपासून ही नदी निर्माण केली. त्यामुळे विद्वान या नदीला कुशावती म्हणतात.

वरील गोष्टी भूतकाळात प्रत्यक्षात घडल्या आहेत का? होय श्री शके १९३१विरोधी संवत्सर अश्वीज शुक्ल त्रयोदशी शुक्रवारी (०२-१०-२००९). ब्रह्मसृष्टीच्या या पुण्यतम नदीने आपल्या जन्माचा उद्देश पूर्ण केला. पर्तगाळी इतिहासात तो एक अनोखा स्मृतीदिन होता हे आवर्जून नमूद करावे लागेल.
सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि दुपारी एक वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. कुशावतीला श्री रामदेवांच्या पादुकांच्या सेवेसाठी तातडीने नेण्यात आले. प्रत्येक मिनिटाला नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. भगवान ब्रह्मदेवांच्या आज्ञेने कुशावती नदी श्रीरामदेवांच्या पदस्पर्शाला श्रीरामदेव समोर येत होते. संध्याकाळपर्यंत, पुराचे पाणी झपाट्याने वाढले होते. हळुहळु कुशावती मठाच्या मागच्या बाजूला पोहोचली आणि तिने मठात येण्याचा इशारा दिला. अर्ध्या तासाने वाढत्या पाण्याने श्री रामदेवाच्या गर्भगृहात प्रवेश केला आणि श्री रामदेवाच्या पदस्पर्शाने आपल्या जन्माचा उद्देश सार्त करून घेतला. त्यावेळी नदीच्या पाण्याची पातळी सुमारे २० फूट वाढली होती.
अशी घटना मठाच्या इतिहासात यापूर्वी घडल्याची माहिति नाही. पण श्री विद्याधिराज तीर्थ हे २००९ साली घढलेल्या या घटनेचे पहिले साक्षीदार होत. वर लिहिलेली गुरु परंपरा ही केवळ एक परीकथा नाही, तर निर्मात्याच्या निर्मिती उद्देशाची यशोगाथा आहे.
जर काही महान घडत असेल, तर या क्षेत्रात काहीतरी विशेष असले पाहिजे. तीच कुशावती नदी ईशान्यप्लवा समुद्रास मिळते. म्हणूनच विश्वकर्माने निर्मित केलेल्या श्री रामचंद्र सीता देवी, लक्ष्मण आणि हनुमान या पाषाणी मूर्ती गोकर्णाच्या भूगर्भातून बाहेर येऊन पर्तगाळी येथे, वास्तुशास्त्रात गोविथी मणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र ठिकाणी स्थायिक झाल्या. श्री रामचंद्र तीर्थ स्वामींना कामधेनूद्वारे निर्देशित केलेल्या या गोविथी देवभूमीस विषेश प्रकारचे वास्तुशास्त्रीय महत्त्व आहे. ते असे.
मंदिरासारख्या पवित्र वास्तूच्या बांधकामाचे काही नियम वास्तु शास्त्रांमध्ये दिलेले आहेत.

जी जमीन उत्तरेला सखल आहे, जिथे पावसाचे पाणी पडते आणि जमिनीचा नैसर्गिक प्रवाह उत्तरेकडे असतो, ती समृद्ध संपत्ती देते. पूर्वेला सखल प्रदेश समृद्धी देतो. कुशावती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, पर्तगाळी मठाजवळ उत्तरेकडे वळते आणि तेथून ईशान्येकडे. वास्तुशात्रामध्ये अशा स्थानाला ईशान्य प्लवा म्हणतात आणि देवभूमी, गोविथी असेही वर्णन केले आहे. (मुहूर्तमाधवी अध्याय १-५) समुद्राला मिळणारी नदी त्याहूनही मोठी आहे. त्यामुळे सर्वांसाठी या स्थानाला खूप महत्त्व आहे.

’उदगादि प्लवा भूमिः’, वायव्य, उत्तर आणि ईशान्य प्रदेश या तिन्ही दिशांच्या रहिवाशांवर सकारात्मक प्रभाव पडतो. वरील शास्त्रोक्ति कशी फळ देतात याचे धगधगते ज्वलंत उदाहरण म्हणजे पर्तगाळ मठ होय.
इ.स १६५६ साली दैवी इच्छेनुसार श्री रामाची मूर्ती घेऊन श्री रामचंद्र तीर्थ या ठिकाणी आले तेव्हा डोंगरपायथळी जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका निर्जन स्थळी हि नदी आहे. या ठिकाणी पडलेले गोमय पहताना येथे पाणी पिण्यासाठी गुरे येत आसावित असे माण्यनात आले, पुढे श्री रामचंद्र तीर्थांनी येथे श्री रामचंद्राची मूर्ती बसवली व मठ बांधून येथेच राहिले. आपल्या वनवासाच्या काळात श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह ज्याप्राकारे गोदावरी नदीकाठी राहत होते तसेच या पवित्र क्षेत्रात श्री रामाचे वास्तव्य झाले.
तेव्हापासून श्रीमठाचा विकास सुरू झाला. दूर मंगळूर येथे इ.स १६६० मध्ये शाखा स्थापन करण्यात आली. पर्तगाळींत देव-गुरुंशिवाय दुसऱ्या कोणचेही वास्तव्य नव्हते. पुढे याच मठात पहिल्या शिष्याच्या संन्यास दीक्षेचा कार्यक्रम झाला. श्री रघुचंद्र तीर्थ हे संन्यासी झाले आणि अंकोला येथे मठाची शाखा झाली. जेव्हा श्री रघुचंद्र तीर्थ गुरुपिठावर आले तेव्हा पासून पर्तगाळी येथे पाच दिवसांचा रथोत्सव सुरू झाला. रथोत्सव उध्वस्त करण्यासाठी आलेल्या नारायण भूतला मारुतीच्या पायी रथबिदीत स्थंबित करण्यात आले. सुरवातिस फक्त चार शाखा आसलेल्या मठाचा विस्थार होतगेला व देशभरात विविध ठिकाणी एकूण ३३ शाखामठ उभे राहिले. यामूळे आपोआप मठाच्या अनुयायांचीही अभिवृद्धि झाली. त्यांच्या गावी नवीन मंदिर निर्मिती झाली आणि २५० हून अधिक मंदिरे मठाच्या धार्मिक कक्षेत आली.
अशा प्रकारे दिवसेंदिवस विकासाच्या वाटेवरील यशोगाथेच्या पानांमध्ये इ.स. १९५६व्या मन्मथ संवत्सरात मठाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्या जोगे कार्य म्हणजे श्री रामदेवास सुवर्ण मंडप समर्पण करण्यात आला. मंदिर निर्मितीस वास्तुशास्त्रास अत्यंत महत्वाचे ठरते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे पर्तगाळि मठ होय. असा निसर्ग संपन्न प्राकार हा श्री रामदेवाने पर्तगाळि मठास दिलेला आशिर्वाद असे म्हटल्यास अतिशयोक्ति होत नाही.

पुरा विधात्रा रघुनाथसेवां करिष्यमाणेन कुशाम्बुबिंदुना |
विनिर्मिता सात्र सरित्वारा वने कुशावतीं तां प्रवदन्ति सूरयः ||२३||
(तृतीय स्थबक, श्री गुरुपरंपरामुतम्)