Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

Jeevottam Marathi

जीवोत्तम पुरस्कर


श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे भक्त हे देशभरात विखुरलेले आहेत. मठापासून कितीही दूर असले तरी त्यांची गुरुभक्ती व स्वामीनिष्ठा कधीच कमी झाली नाही. मात्र वर्षातून एकदा तरी ते गुरुमठाला येऊन गुरुवर्यांची भेट घेत असत. कुलदैवता इतकीच कुलगुरुवरही त्यांची निष्ठा. गौड सारस्वत समाजाच्या या निष्ठेने इतर समाजही आपल्याशी आदराने वागतो. हे इतर समाजातील काही मठाधीशांनी त्यांच्या अनुयायांना दाखवून दिले आहे. देव-गुरूंवरील त्यांची भक्ती कमी झाली नाही. गुरूंच्या मार्गदर्शनाने आपला समाज चांगला होत आहे. अनेक समाज बांधव आपल्या दैनंदिन व्यवसायासह समाजसेवा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शिक्षण असो, वैद्यकीय असो, विवाह विषयक असो वा समाजमंदिर असो किंवा समाजात कुठलेही क्षेत्र असो ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाची सेवा करत असतात. समाजांतील अशा रत्नांची निवड करून श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळि जीवोत्तम मठाच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल-२ दिनी स्वामिजिंच्या हस्ते समाज, शाखामठ व पर्तगाळी मठासाठी अमूल्य सेवा करणाऱ्या समाजातील दोन व्यक्तींची निवड करून त्यांना जीवोत्तम पुरस्काराने सन्मानित केले जाते. समस्त गौडसारस्वत समाजात हा गौरव मोट्या प्रतिष्ठेचा व मानाचा गणला जातो. त्यांच्या सामाजीक जीवनांतील ही अनमोल व भाग्यशाली गोष्ट ठरते. म्हणून हा सत्कार इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

  क्र.सं

  वर्ष

  मानकरी

  गांव

  १

  २०११

गजनन बाबुराव भट्ट

  यल्लापूर

  २

  २०११

हनुमंत (पुत्तु) म्हाळप्पा पै

  भट्कळ

  २०१२

सुधाकर दासप्पा शानभाग

  बेळगावी

  ४

  २०१२

कृष्णकुमार नागप्पा पै

  बेळगावी

  ५

  २०१३

शिवानंद वासुदेव साळगांवकर

  वास्को

  ६

  २०१३

रामचंद्र नारायण नायक

  हुब्बळ्ळी

  ७

  २०१४

एस्. प्रभाकर कामत

  मंगळूरु

  ८

  २०१४

गणपती एस. कामत 

  कुमटा

  ९

  २०१५

शिवानंद लक्ष्मण कामत 

  मंगळुरु

  १०

  २०१५

कृष्ण बाबा पै 

  कुमटा