Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

20 Mumbai Marathi

२० श्री राम मंदिर

श्री द्वारकानाथ भवन, कत्रक रोड वडाला मुंबई ४०००३१, फोन ०२२-२४१२२५३५

संस्थापक : श्री द्वारकानाथ तीर्थ (२२)
शिलान्यास : शके १८७२ विक्रती संवत्सर, मार्गशीर्ष शुक्ल-१३ (२२/१२/१९५०)
उद्घाटन : शके १८७६ जय संवत्सर माघ शुक्ल १०, (२-२-१९५५), द्वारकानाथ भवन उद्घाटन
गोकर्ण मठाचे श्री द्वारकानाथ तीर्थ स्वामीजिंच्या समवेत श्री संस्थान काशी मठाचे श्री सुधींद्र तीर्थ स्वामीजी हस्ते उद्घाटन.
देव प्रतिष्ठा : शके १८८७ विश्वावसु संवत्सर माघ शुक्ल-८ (०७/०२/१९६५)
देव प्रतिमा : श्री राम, सीता व लक्ष्मण (पाषाण मूर्ती)
इतर प्रतिमा : नवग्रह (पाषाण मूर्ती), नाग देवता (पाषाणी)
एकूण क्षेत्रफळ: १०,००० चौ. मीटर
इमारतीचा तपशील: ३ सभाभवन : श्री द्वारकानाथ भवन (एसी)
: श्री विद्याधिराज सभाग्रह (एसी)
: श्री इंदिराकांत सभाग्रह (एसी)
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव, गणेश चतुर्थी, राम नवमी रथोत्सव

उत्तरकन्नड आणि दक्षिण कन्नड मधील सारस्वत साधारण ७ व्या शतकात त्यांच्या व्यवसाय निमित्त भारतातील चार मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरीत पोहोचले. सारस्वतांची संख्या एकामागून एक वाढत गेली. मुंबईत वेग वेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या सारस्वतांना एकत्र येण्यासाठी जागा हवी होती. सारस्वतांनी आपले कुलदैवत आणि कुलगुरुंचा कधीच विसर पडु दिला नाही. लग्न, उपनयन, तथा अन्य धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन घेण्यासाठी पर्तगाळीला यावे लागत होते. श्री द्वारकानाथ तीर्थ स्वामीजींनी आपल्या शिष्यांच्या सोयीसाठी मुंबईत गोकर्ण मठाची शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मठाच्या स्थापने साठी स्वामिजींनी समुद्र मार्गे गोव्यातून मुंबई शहरात प्रवेश करताना मानाच्या गेटवे ऑफ इंडियात त्यांच खास स्वागत करण्यात आले. या वेळी मुंबईतील प्रतिष्ठित मान्यवर श्री द्वारकानाथ तीर्थ स्वामीजींच्या स्वागतास हाजर होते.

२२-१२-१९५० रोजी स्वामिजींनी मठाच्या बांधकामा साठि एख स्थानीक समिती गठीत केली. मुंबई महानगर पालिकेकडून आवश्यक मंजुरी, योग्य इमारत आराखडा आणि आवश्यक साहित्यासह इमारतीची रचना पूर्ण करून शके १८७६ जय संवत्सर माघशुक्ल दशमी दिनी श्री द्वारकानाथ तीर्थानी काशीमठाचे स्वामी श्री सुधींद्र तीर्थासह श्री काशीमठातून आगमन झाले व द्वारकानाथ भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी देव प्रतिमा स्थापन करण्याच ठरवून स्वामीजींनी श्री शके १८८७ विश्वावसु संवत्सर माघशुक्ल -८मी दिनी श्री राम, सीता, लक्ष्मण या पाषाणी मूर्तींची प्रतीष्टापना करण्यांत आली. दरवर्षी होणारा रामनवमी उत्सव मुंबईंतील मोठ्या उत्सवा पैकी एक म्हणून गणला जातो.

वडाळातील गणपती उत्सव हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती उत्सवांपैकी एक आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या धार्मिक उत्सवात मुंबईतील दिग्गज व्यक्ती, राष्ट्रीय पातळीवरील राजकारणी आणि सेलिब्रिटी हजेरी लावतात. आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणारी गणेशोत्सव समिती ही आपल्या समाजातील सर्वात मोठी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणेशोत्सव समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक मानधन देण्याचा उपक्रम राबविला जातो.

पनवेल येथील शांतीकुंज हे मुंबईच्या वडाळा राम मंदिराच्या कक्षेत येते. वृधापकाळी गरजू समाज बांधवांना निवासाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुंबईपासून ४० किमी अंतरावर असलेल्या १६ एकर जागेत मराठी माध्यमाची शाळा, वैद्यकीय सुविधा, सिंगल व डबल खोल्या, दोन स्वतंत्र छोटी घरे, एक सुंदर मंदिर, प्रशस्त रस्ता, सामूहिक भोजन शाळा, उद्यान इत्यादी सुविधा या ठीकाणी उपलब्ध केल्या आहेत.

श्री द्वारकानाथ तीर्थाच्या दूरदृष्टिने व त्यांच्याच मार्गदर्शनाने स्थापन झालेली गोकर्ण मठ शाखा ही मुंबई बृहन्नगरीत सारस्वत समाजाचे वैभव म्हणून दिमाखाने उभी आहे.