Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

12 Yellapur Math Marathi

१२ श्री लक्ष्मीनारयण वेंकटरमण मठ

मेन रोड, यल्लापुर ५८१३५९, फोन ०८४१९ २६०२२७

संस्थापक : श्री भूविजयरामचंद्र तीर्थ (१४)
स्थापना वर्ष : शके १७१२ साधरण संवत्सर (सुमारे १७९० इ.स.)
देव प्रतिमा : श्री लक्ष्मीवेंकटरमण (धातूची मूर्ती)
शिलान्यास : श्रीशके १९०० कालयुक्त संवत्सर वैशाख शुक्ल १२ (१९/०५/१९७८) श्री विद्याधिराज तीर्थ
नूतनीकरण : श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजी (२३). शके १९०४ दुंदुभी, फाल्गुन बहुळ १०
आणि स्थलांतर (०८/०४/१९८३)
एकूण क्षेत्रफळ : ४०५० चौ. मीटर
बिल्ट-अप क्षेत्रः ३२५० चौरस मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, गुरुभवन, अग्रशाळा, अर्चक निवास, अन्नपूर्णा पाकशाळा, ३ सभामंडप, १४ खोल्या,
पार्किंग, बुफेसाठी खुली जागा इ.
शिबिका : २ लाकडी शिबिका.
सभाभवन : १) श्री वेदव्यास सभामंडप, २) राधावैकुंठ सभाग्रह. ३) श्री श्रीनिवास मंडप
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव : फाल्गुन बहुळ दशमी, अनंत चतुर्दशी, वनभोजन : मार्गशीर्ष पौर्णिमा,
वरमहालक्ष्मी व्रत, आषाढ एकादशी

१२ यल्लापूर मठाचा इतिहास

यल्लापूर येथील श्री लक्ष्मीनारायण व्यंकटरमण मठ हा सह्याद्री पर्वत रांगेत असलेला सर्वात जुना मठ आहे. गोकर्ण मठ परंपरेतील १४वे गुरुवर्य श्री भूविजय रामचंद्र तीर्थांनी १७९० च्या सुमारास यल्लापूर मठ बांधला.

समुद्र किनाऱ्यालगत् असलेल्या घाटमाथ्यावरील घनदाट जंगलांत यल्लापूर गांव वसलेला आहे. पर्तगाळी मठातून यल्लापूर मठांत तसेच हुबळि शिरसी, सिद्दापूर व इतर घाट माथ्यावरील प्रदेशात येण्यासाठी त्यावेळी माचूलाने (मेणा) काळीनदी ओलांडून जंगल मार्गे प्रवास करावा लगत असे.
त्यावेळि मंत्रालयातील राघवेंद्र तीर्थ स्वामिजींना गोकर्ण क्षेत्राला भेट द्यायची होती, गोकर्ण येथे एक वैष्णव मठ असल्याचे त्याना माहिती होते. त्यासाठी त्यांनी गोकर्ण मठाच्या स्वामिजींना रायस पाठवुन कळविले की आम्हांस गोकर्ण येथील हाटकेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही तडस गावांतून तुमच्या गांवी येतो. त्यानुसार गुरूंनी श्रीराघवेंद्र स्वामिजींना यल्लापूरहून गोकर्ण येथे नेऊन क्षेत्रदर्शन घडविले व त्यांचा योग्य सत्कारही केला. यल्लापूर आणि गोकर्ण मठाच्या इतिहासात ती एक अविस्मरणीय घटना होय.
नोकरी व्यवसाया निमित्त यल्लापुरला आलेले सारस्वत त्या ठिकाणी स्थायिक झाले. आशा प्रकारे सारस्वतांची संख्या वाढल्या नंतर सर्वानी स्वामी महाराजाना प्रार्थना करून मठवास्तुचा विस्तार करण्यासाठी स्थलांतर करण्याची विनंती केली. त्यांच्या मागणीनुसार स्वामीजींनी राष्ट्रिय महामार्गाच्या जवळ असलेल्या एक एकर जमीनीत सन् १९०० कालयुक्त संवत्सर वैशाख शुक्ल १२ला (१९/०५/१९७८) नूतन मठवास्तुचा शिलान्यास केला. स्वामिजींच्या मंगल हस्ते या वास्तुत शके १९०४ दुंदुभी संवत्सर फाल्गुन बहुळ दशमिच्या शुभमुहूर्तावर श्री वेंकटरमण शिला मूर्तिची प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर स्वामिजी प्रतिवर्षी वर्धंती उत्सवास यल्लापुर मठास भेट देण्याची प्रथा सुरु होती. सन् २००३ साली श्री विद्याधिराज तीर्थ स्वामिजिंनी याच मठांत आपले ३७वे चातुर्मास व्रताचरण केले. त्यासाठी मठवास्तुचा विस्तार करण्यात आला.