Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

33 Bharavati Marathi

३३ श्री विद्याधिराज सभाग्रह

हेब्बंडे रोड, नियर आई.टि. आई, बि.एच् रोड, भद्रावती ५७७३०१, पोन ०८२८२-२६६९१३.

संस्‍थापक : श्री विद्याधिराज तीर्थ (२३)
शिलान्यास : शके १९२३ वृष संवत्सर, माघ बहुळ नवमी (०७-०३-२००२)
उद्घाटन : शके १९२५ सुभानु कार्तिक बहुळ-५ (१४-११-२००३)
बांधकाम क्षेत्र : ६७५ चौ.मीटर
इमारतीचा तपशील : सभाभवन, स्वयंपाकघर, भोजनशाळा, हॉल, पार्किंगसाठी खुली जागा इ.
सभाभवन : श्री विद्याधिराज सभागृह


भद्रावती हे शिमोगा जवळ असलेले औद्योगिक क्षेत्र म्हणुन प्रसिद्ध आहे. या ठीकाणी साधारण पन्नाशेक गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबे वेगवेगळ्या व्यवसाया निमित्त स्थायिक झाली. वेगवेगळ्या निमित्याने या कुटुंबाचा आपसात संपर्क असला तरी योग्य जागे अभावी त्यांचांतील एकोपा म्हणावा तितका धृढ होऊ शकला नाही. सांस्कृतीक, सामाजिक तसेच अन्य कार्यक्रमा निमित्त एकत्र य़ेण्यासाठी त्याना स्वतंत्र जागेची नितांत गरज भासु लागली. जागा असूनही वास्तुला मूर्तस्वरूप घडून येण्याचा योग जुळुन येत नव्हता.
आशा स्थीतित परमपूज्य श्री विद्याधिराज तीर्थ स्वामिजिंची त्या गावांतील भेट ही संस्मरणीय ठरली, व त्यातूनच विद्याधिराज सभाग्रहाचा खऱ्या अर्थाने उदय झाल. त्या भागंतील शिश्यवर्गांची सामाजिक कार्यासाठी जागे विषयी असलेली अडचण लक्षांत घेऊन श्रींनी सर्वाना योग्य मार्गदर्शन केले व त्यांच्याच सूचनेनी या कामा साठी दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यानुसार ०७-०३-२००२ रोजी या वासुचा शिलान्यास श्रींच्या हस्ते झाला व त्यानंतर लागुन आसलेला प्लोट सदर कामासाठी विकत घेण्यात आला. आराखडा व इतर सोपस्कार पूर्णकरून प्रत्यक्ष बांदकामास सुरवात झाली व अवघ्या १५ महिन्यात बांधकाम पूर्ण होऊन सुबक वास्तु तयार झाली. पूज्य स्वामिजिंच्या हस्ते १४-११-२००३ रोजी विद्याधिराज भवानाचे उद्घाटन करण्यात आले.