Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

श्रीमद् लक्ष्मीकांत तीर्थ

दीक्षागुरु : श्री लक्ष्मीनारायण तीर्थ (९)
शिष्यस्वीकार : श्री रमाकांत तीर्थ
महानिर्वाण : श्रीशके १६२९ सर्वजितु संवत्सर मार्गशीर्ष शुक्ल २या शनिवार (२६-११-१७०७)
वृंदावन स्थळ : श्री राममंदिर होन्नावर
गुरुपीठकालावधी : ४ वर्षे ८ महिने १७ दिवस

श्रीलक्ष्मीनारायणतीर्थ समाधिस्त झाल्यावर त्यांचे शिष्य लक्ष्मीकांततीर्थ यांस पट्टाभिषेक करण्यात आला. १६१६ या वर्षी त्यांना पट्टाभिषेक झाला. यांनी पर्तगाळी व होन्नावर या दोन्ही मठात निवास केला. श्री लक्ष्मीकांततीर्थांच्या काळातील जे कागदपत्र उपलब्ध् आहेत त्यावरून त्यांच्या कारकीर्दिंत संस्थानाला जमिनीच्या रुपाने खूप देणग्या मिळाल्या. १६१३ मध्ये मठाच्या भक्तजनांनी रथोत्सवा करता लोलये गावांतील जमीन दिली. १६१९ मडकईचे हरकामत व पैंगिणचे भक्तानी तसेच नेत्रावळिचे कामताने आपली शेत जमीन दिली. १६२६ मध्ये नगर्से गांवाच्या भक्तांनी आणखी एका शेताचे दानपत्र केले. १६२७ मध्ये अंकोलेच्या पिळगांवकर कामत शेणवी यांनी तसेच १६२९ मध्ये फटशेणवी तेलंग व मुडगेरि समस्त देसई यांनी केलेले दानपत्र दप्तरात उपलब्ध आहे.
शके १६२९ चा त्यांच्या नांवाचा उल्लेख असलेला शेवटचा कागद दप्तरात उपलब्ध आहे. श्रीशके १६२९ सर्वजितु संवत्सर मार्गशीर्ष शु. २ या होन्नावर मठांत त्यांनी समाधी घेतली.

लक्ष्मीकान्तगुरुं वन्दे दीनसज्जनतारकम् ।
लक्ष्मीकान्तकृपापात्रं ज्ञानवैराग्यसागरम् ।।