वटवृक्ष, इतिहासाचा मूक साक्षीदार
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शांत व रम्य परिसरात, ईशान्यप्लवा समुद्रगामिनि कुशावती नदीच्या तीरावर वसलेल्या पर्तगाळी येथे मठाचे मुख्यालय आहे. या परिसरात आसलेला हजारो वर्षांचा पुरातन महाकाय वटवृक्ष म्हणजे एक ध्यान साधनेचे तपस्या क्षेत्र होय. ब्रह्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वटवृक्षाच्या छायेत पूर्वी पैंगी ऋषी ध्यानसाधना व तपश्चर्ये साठी बसत् असत. त्या नंतर कित्येक योगी तथा ऋषीनीं या वटवृक्षाच्या शितळ छायेत अध्यात्माची अनुभूती घेतली आहे.
वटवृक्ष हा अत्यंत पवित्र वृक्षांत गणला जातो. त्याला क्षय नाही. झाडाच्या फांद्यावरून खाली आलेली पारंबे जमीनीत मूळे धरतात व वटवृक्षाची कक्षा व क्षेत्र विस्तारित करतात. त्यामूळे झाडाला आधार मिळतो. मानव जाती बरोबरच इतर पशु पक्षानाहीं या वटवृक्षाचा फार मोठा आधार वाटतो.
आपल्या देशात विशाल वटवृक्ष फार कमी प्रमाणात आहेत. त्यातील एक पर्तगाळी मठाच्या परिसरात आहे ही अभीमानाची गोष्ट ठरते. मठाच्या उत्तरेस सुमारे २०० मिटर अंतरावर हा विस्तिर्ण वटवृक्ष दिमाखात उभा आहे. साधारण २०० पारंब्यानी विस्तृत जागा या वटवृक्षाने व्यापली आहे. पूर्वेपासून पश्चिमे पर्यंत साधारण २३५ फूट तर दक्षिणोत्तर २२५ फूट येवढ्या विस्तृत परिसरात हा वटवृक्ष विस्तारलेला आहे. हजारो पारंब्या मधून शितळ छायेत वटवृक्षा खाली फिरताना वेगळीच अनुभूती लाभते. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा वटवृक्षची पर्तगाळी तसेच आसपासच्या भागातील रहिवसी मोठ्या श्रद्धा भक्तिने आरधना करतात.
हा पवित्र वटवृक्ष म्हणजे सुमारे ५०० वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या आध्यात्मीक वाटचालिचा मूक साक्षीदार होय. वटवृक्षाच्या विस्थारित क्षेत्रात पसरलेल्या पारंब्या म्हणजे जणु पूज्य स्वमिजींच्या मार्गदर्शनाने विबीध ठिकाणि स्थापन केलेल्या मठशाखा तथा मंदिरांच्ये प्रतीकच म्हणावे लागेल. तर जमीनीत खोलवर रुजलेली वटवृक्षाची मूळे म्हणजे शिष्यांची गुरुपीठाप्रती भावपूर्ण भक्ति दर्शवितात.
आशा या पवित्र व पुरातन वटवृक्षाचे महत्व लक्षात घेऊन त्याची प्रतिकृती “विद्याधिराज पुरस्कारा” साठी स्मृतचिन्ह म्हणुन प्रदान करण्यात येते.