२ श्रीमद् वासुदेव तीर्थ
दीक्षागुरु : श्री नारायण तीर्थ
शिष्य स्वीकार : श्री जीवोत्तम तीर्थ (३) १४३९ ईश्वर संवत्सर माघ शुद्ध चतुर्दशी
महानिर्वण : शके १४४० बहुधान्य संवत्सर वैशाख शुक्ल ३या, मंगळवार (२३/०४/१५१८)
वृंदावन स्थळ : भीमातीरी, पंढरपूर
गुरु पीठावर काळ : ११मास २४ दिवस
आद्यगुरुवर्य श्रीमद् नारायणतीर्थांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे शिष्य श्रीवासुदेवतीर्थ यांनी पीठाधिकार स्वीकार केला. त्यांनी शके १४३९ मध्ये जीवोत्तमतीर्थांना आश्रम दिल्यावर ते तीर्थयात्रेला पंढरपूर येथे गेले होते. त्यांनी जीवोत्तमतीर्थांस आश्रम दिल्याची तिथी माघ शु. १४ ही आहे. त्यानंतर ते प्रवासाला गेले व शके १४४० भीमातीरी त्यांनी देह ठेवला. गुरुपरंपरामृतांत यांच्या समाधी विषयी उल्लेख आहे तो असा –
तीरे भीमरथीनद्या वासुदेवमुनेरभूत । वैशाखे मासि शुक्लायां तृतीयां समाधिभूः ।।
वासुदेवगुरुं वन्दे रागदोषविवर्जितम् ।
पूतगात्रं महायात्रं नारायणकरोद्भवम् ॥