Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

31 Nasik Marathi

३१ श्री लक्ष्मीनारायण मंदिर

वार्ड नंबर ४५, चेतन नगर, नासिक ४२२००१, फोन ०२५३-२५९६५५६

संस्थापक : श्री विद्याधिराज तीर्थ (२३)
शिलान्यास : शके १९२२ विक्रम, भाद्रपद बहुळ-२ (१५-०९-२०००)
उद्घाटन : शके १९२४ चित्रभानु संवत्सर फाल्गुन बहुळ ७ (०४/०४/२००२)
श्री लक्ष्मीनारायण तीर्थ (९) स्वामीजींची ३००वी पुण्यतिथी दिनी
(शके १६२४ चित्रभानु, फाल्गुन बहुळ-७)
प्रतिमा : श्री लक्ष्मी नारायण (संगमरवरी मूर्ती)
एकूण क्षेत्रफळ : २५०० चौ.मीटर
बांधकाम क्षेत्र : ६१० चौरस मीटर
इमारतीचा तपशील : गुरुभवन, सभाभवन, स्वयंपाकघर.
सभाभवन : श्री लक्ष्मीनारायण भवन

श्रीमद् लक्ष्मीनारायण तीर्थ यांनी वाराणसी मठाची पुनर्बांधणी केली आणि पर्तगाळी रामनवमी उत्सवासाठी तब्बल आठ वर्षानी त्यांचे आगमन होणार असल्याचे समजतांच सर्व समाजात आनंदी वातावरण निर्माण झाले. आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर गुरूंच्या उपस्तीतींत रामनवमी उत्सवाला सहभागी होण्याचे ठरवले. पण अनपेक्षित घटना घडली. श्री लक्ष्मीनारायण तीर्थ पर्तगाळी परतीच्या वाटेवर नाशिकच्या गोदावरीच्या काठी श्री शके १६२७ दुंधुभी संवत्सर फाल्गुन वद्य सप्तमीला वृंदावनस्थ झाले.
आपल्या गुरूंच्या आगमनाच्या वृत्ताने आनंदित झालेला शिष्यवर्ग या दुखःद समाचाराने शोकाकूल झाला. आठ वर्षांपूर्वी वाराणसीला प्रस्थान केलेल्या आपल्या गुरुंच्या आगमनाची शबरी प्रमाणे वाट पाहत होते. पण न डगमगता पुढच्या कामास तत्पर झाले. त्यांनी गुरुपीठारोहणा पूर्वी नाशिक येथे गुरु वृंदावन बांधण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यांनी वृंदावनाच्या पूजेसाठी आवश्यक व्यवस्था केली. कालांतराने नासिकचा संपर्क तुटला आणि वृंदावना विषयी माहिती मिळाली नाही. परंपरेचे २२वे गुरुवर्य श्री द्वारकानाथ तीर्थ यांच्या काळात वृंदावन शोधण्याचा प्रयत्न केला. असे वृंदावन नाशिकच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर मिळाले पण ती व्यक्ति सदर वृंदावनावर आपली मालकी सांगत होती.

चांगल्या कामासाठी दैवी प्रेरणा आपोआप लाभते व निर्धारित कामे सुव्यवस्थित रीतीने घडतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नासिक शाखामठ. श्रीरामाने आपला बहुतेक काळ गोदावरीच्या नासिक येथील पंचवटीत घालवला. नासिक परिसरात भेटीच्या दरम्यान श्रीविद्याधिराज तीर्थांना श्री लक्ष्मीनारायण तीर्थ यांचे स्मरण होत असे. आपल्या गुरुंच्या वृंदावनाचा शोध घेण्यासाठी तसेच श्री लक्ष्मीनारायण तीर्थ स्मारक मंदिर बांधण्याची जाणीव होती. दैवी सहकार्य मिळाले.

श्री लक्ष्मीनारायण तीर्थ वृंदावनस्थ होऊन ३००व्या वर्षी नासिक मध्येच श्री शके १९२२ श्रीमद् विद्यधिराज तीर्थ स्वामिजिंचा चातुर्मास घडून यावा ही सुद्धा ईश्वरी प्रेरणा आहे. त्याचमूळे कोणतीही पूर्वतयारी नसताना चातुर्मासा साठी स्वामिजी नासिकात आले. नासिकच्या मठाच्या फायलींमध्ये गोकर्ण मठाच्या मालकीची जागा आसल्याचा कागतपत्र सापडला. जागेचा शोध घेतल्यावर, मालमत्तेचा वापर राज्य महामार्गावर पूल बांधण्यासाठी केला गेला आणि त्यासंबंधी श्रीनां भरपाई देण्यात आली होति, पण स्वामिजीनी त्याचा स्वीकार केला नव्हता व भरपाई ऐवजी योग्य आशी दुसरि जागा त्याबदलात देण्याचा विनंती अर्ज साकारी दरबारी केला होता. त्यामुळे नवीन स्थान मिळविण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरले. स्वामिजिंच्या प्रयत्नानी मुंबईच्या महामार्गाजवळ नाशिक शहरात मद्यभागी जागा मिळाली. चातुर्मासव्रत पूर्णकरून निघण्यापूर्वि सदर मठाचा शिलान्यास झाला. त्यानंतर पुढील दीड वर्षांत बांधकाम पूर्णकरून ४ एप्रिल २००२ रोजी श्री लक्ष्मीनारायण भवनाचे भव्य थाटात उद्घाटन झाले. श्री लक्ष्मीनारायणाची चंद्रकांत शिलेचि सुंदर मूर्ति बसवण्यात आली आहे.