Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

????????????????????????????????????

२६. श्री लक्ष्मी वेंकटरमण मठ दांडेलि

अंबिकानगर रोड, दांडेलि ५८१३२५ फोन ०८२८४-२३३१२५४

संस्थापक : श्री विद्याधिराज तीर्थ (२३)
स्थापना वर्ष : शके १९१३ प्रजापती संवत्सर फाल्गुन बहुळा-८ (२६/०३/१९९२)
देव प्रतिमा : श्री वेंकटरमण (पाषाणी)
एकूण क्षेत्रफळ : ७५०७.५० चौ.मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, गुरु भवन, अर्चक निवास, मोकळी जागा
सभाभवन : श्री विद्याधिराज सभाभवन, भोजनशाळा, पाकशाळा, पार्किंग.
शिलान्यास : शके १९२४ चित्रभानु संवत्सर कार्तिक बहुळ-२ (२२-११-२००२)
उद्घाटन : शके १९२५ सुभानु संवत्सर आशाढ बहुळ प्रतिपदा (१४-०७-२००३)
पंचपर्व उत्सव : वर्धंती फाल्गुन वद्य -८

सह्याद्रीच्या उत्तरकन्नड जिल्ह्यात दांडेली शहर हे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या भागांत वास्तव्यात आसलेला सारस्वत समाज जसजसा वाढत गेला तसतसे आपला विकास साधण्यासाठी व उन्नती व्हावी या साठी आपल्या धर्मगुरूंना आमंत्रित केले. शिष्यांच्या निमंत्रणावरून गोकर्ण मठाधीश श्रीमद द्वारकानाथ तीर्थ, इ.स. १९५८ मध्ये दांडेली येथे आले आणि त्यांनी आपल्या वास्तव्यात सारस्वत संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी संघटित होण्याचा संदेश दिला.
विस्थापित समाजाला संघटीत करण्यासाठी मंदीर स्थापनेची नितांत गरज असून त्यासाठी स्वामीजिंच्या मार्गदर्शनाने एक स्थानिक समिती स्थापन करण्यांत आली. देवघर व सभामंटप असलेली मठवास्तु उभारण्यासाठी समितिने कार्य करण्याचा आदेश स्वामिजींनी दिला व त्यानुसार काम सुरु झाले.
श्रींच्या कृपाआशीर्वादाने प्रेरित होऊन, समितीने स्वामिंच्या मार्गदर्शनाखाली वास्तूचे बांधकाम सुरू केले, त्या साठी त्यांनी दांडेली मद्यवर्ति ठीकाणी दोन एकर जागा खरेदी केली. त्या नंतर श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजींनी आपल्या गुरुंचे स्वप्न साकार करण्यासाठी या समितीला मठ बांधण्यास सर्वतोपरी मदत केली.

बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात मंदिर, देवळासमोरील मंडप, देवळाच्या बाजूला श्रींच्या वास्तव्या साठी गुरुभवन, तथा समाजाच्या अस्तित्वाचा मानदंड मानणाऱ्या सुंदर प्रवेशद्वार सहित सुबक वास्तुचे बांधकाम झाले. शालिहवन शके १९१४ प्रजापती संवत्सर फाल्गुन वद्य अष्टमीला (७/८/२००८) विद्याधिराज तीर्थांच्या शुभ हस्ते श्री वेंकटरामण पाषाण मूर्तिची प्रतिष्टापना झाली.

कालांतराने विस्तारित समाजाची गरज ओळखून समाजच्या विविध उपक्रमांस उपयुक्त व इतर धार्मिक कार्यक्रमांची गरज ओळखुन प्रशस्थ सर्वसोई सुविधानी उपयुक्त सभाभवन स्वामिजिंचा आशीर्वाद व मार्गदर्शनाने निर्माण झाले दांडेली येथील भव्य श्री विद्याधिराज सभाभवनाचे उद्घाटन करण्यात आले