Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

9 Mangaluru Math Marathi

९. गोकर्ण मठ मंगळूरु

रथबिदी, मंगळूरु ५७५००१, पो. ०८२४ - २४२४२१०

संस्थापक : श्री रामचंद्र तीर्थ (६)
स्थापना वर्ष : शके १५८२ शार्वरी (१६६० इ.स.)
स्थलांतर : श्री रमाकांत तीर्थ (११) जुना मठ स्थलांतर करून रथबिदीच्या जवळ मुख्य रस्त्यालगतआणले.
नूतनीकरण : श्री पूर्णप्रज्ञ तीर्थ (१८) शके १७६४ शुभक्रत फाल्गुन शुक्ल १० (११/०३/१८४३ शनिवार)
: श्री वीर विठ्ठल पुनः प्रतिष्ठा, नवीन मंदिर इमारत, सुवर्ण शिखर कलश)
देव प्रतिमा : श्री वीरविट्ठल (धातूची मूर्ती)
इतर देवप्रतिष्ठा : नवग्रह (शिलाविग्रह)
कार्पेट क्षेत्रफळ : २५२० चौ.मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, अर्चक निवास, सभागृह, कल्याण मंटप
शिखर कलश : सोन्याचा मुलामा
सामाजिक कार्य : श्री पूर्णप्रज्ञ वसती निलय (वृद्धाश्रम)
सभाभवन : श्री द्वारकानाथ भवन, श्री पूर्णप्रज्ञ सभाभवन
पंचपर्व उत्सव : इंदिराकांत पुण्यतिथी : चैत्र बहुळ-७, अनंत चतुर्दशी.

मंगळूर येथील गोकर्ण मठ्ठ स्थापनेचे अवलोकन

दशगोत्री ब्राह्मण ज्यांना सरस्वती नदीतून श्री विष्णू अवतार परशुरामाने यज्ञ-याग करण्यासाठी आणले होते, ते देवस्थानात अर्चक म्हणुन सेवा करीत होते, बाटाबाटीच्यावेळी पोर्तुगीजांची दडपशाही आणि धर्मांतरामुळे त्यांचे अतोनात हाल होऊ लागले. त्यावेळी यातील काही कुटुंबानी स्थलांतर केले. आशी काही कुटुंबे मंगळूर आणि बसरूर येथे स्थायिक झाली आहेत. तिकडच्या गौड सारस्वत समाजा बरोबर त्यांनी आपुलकिचे व प्रेमाचे संबंध जपले. काही कुटुंबे मंगळूर आणि त्याच्या परिसरात स्थायिक झाली. त्यांची साधी राहणी, देवभक्ति, व्यवहारिक चातुर्य, नैपुण्य, त्यांची शैक्षणिक उत्कृष्टता आणि लोकांना मदत करण्याचा त्यांच्यांतील जन्मजात गुणामुळे काही सामाजिक गट ईर्षेने त्यांचा अनादर करण्याचा प्रयत्न करत होते. तुम्हाला गुरुपीठ नाही, कर्मकांड करण्यास पात्र असलेले कोणतेही विद्वान नाहीत, तुम्ही मत्स्य आहार करतात, आशाप्रकारे त्यांच्यावर टीका केली जात होती. आपल्या समाजाला या गोष्टिचि खंत लागुन राहिली होती.
सातव्या शतकापासून चालत आलेला हा प्रसंग लोकांसाठी नेहमीच दु:ख देणारा ठरला होता. त्या काळी मंगळुरूच्या वातावरणात, मुळिकापूर (मुल्की), कार्कळ आणि मंजेश्वरा येथे फक्त गौडसारस्वतांची छोटी मंदिरे होती. श्री संस्थान गोकर्ण पर्तगळी मठाचे वाराणसी आणि भटकळ येथील पहिले मठ होते. श्री नारायण तीर्थांनी माध्व परंपरेतील पहिल्या गुरु पीठाची स्थापना केली होती. मठपरंपरेंतील श्री जीवोत्तम तीर्थानी (३) गोकर्ण तसेच आपले जन्मस्थान असलेल्या बस्रुर येथे शाखामठांची स्थापना केली. ५वे यतिवर्य श्री अणुजीवोत्तम यांनी गोव्यांतील डिचोलीमध्ये, तसेच श्री रामचंद्र तीर्थ (६वे), यांनी पर्तगाळी तसेच ऋषिवन (रिवण) मध्ये मठ स्थापित केले.
मठपरंपरेतील सहावे यतिवर्य श्री रामचंद्र तीर्थ यांनी दक्षिण भारताच्या तीर्थक्षेत्र यात्रे साठी प्रयाण केले, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेत्रावती आणि कुमारधारा नद्यांचा संगम होतो ते उप्पिनंगडी ठिकाण गयापाद क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी स्वामिजीनी मुक्काम केला होता. स्वामिजींच्या मुक्कामाची माहिति समताच मंगळुरू येथील गौड सारस्वत ब्राह्मण समाजांतील शंभरहून अधिक सदस्यांनी श्री रामचंद्र तीर्थ स्वामिजी पाशी आपले मनातील दुखः व्यक्त केले. आमचे मंगळूर येथे देवस्थान असलेले गुरुपीठ आहे. आपणही षटकर्मी आहोत, यज्ञ, उपनयन विवाह इत्यादी विधी पार पाडण्यासाठी, गुरुपीठाच्या मार्गदर्शनाने चालणारे मंदीरे हवे, याची जाणीव इतर समाजाला व्हावी या साठी एक मंदिर स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती त्यानी स्वामी महाराजां पाशी केली. त्यांच्या मनांतिल दुखाःचि भावना स्वामिजीनी जाणली व त्यांचे समाधान केले. यातुनच पूज्य स्वामिजींच्या मार्गदर्शनाने मंगळूरच्या मध्यभागी एक मंदिर बांधले. मंगळूर मधील हे पहिले गौडसारस्वत मंदिर होते आणि ते समाजाचे केंद्र बनले होते.
गोकर्ण मठाची ही शाखा गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या केंद्रस्थानी दिवसेंदिवस विकसित होऊ लागली. उडुपीच्या अष्टमठास मुद्राधारणे साठी जाणारे अनेक भावीक या मंदिरात येऊ लागले. गुरूंच्या आगमनाने मंदिरातील पंचपर्व उत्सवही साजरे होऊ लागले. जसजसा समाज विकसित झाला, त्याप्रमाणे श्री पूर्णप्रज्ञ तीर्थांनी मठ वास्तु विस्तारित करण्याची योजना आखली. त्यानुसार मठवास्तु मुख्य रस्त्याच्या नजदीक स्थापन करण्यासाठी शके १७६२ शार्वरी (सन् १८४१) साली शिलान्यास करण्यात आला. शके १७६४ शुभक्रत संवत्सरात फाल्गुन शुक्ल दशमी शनिवार मीनलग्नात श्री विठोबाची स्थापना केली. शिखरावर सोन्याचा मुलामा चढवला. सुवर्णकलश असलेले दक्षिण कन्नड प्रदेशातील प्रथम मंदिर म्हणून त्याची ख्याती आहे. काशीमठाचे श्री भुवनेंद्र तीर्थ यानिं त्यांचे शिष्य श्री वरदेंद्र तीर्थ यांच्यासमवेत गोकर्ण मठात चातुर्मास व्रत आचरण केले. परंपरेंतील २०वे गुरुवर्य श्री इंदिराकांततीर्थांनी आपले पहिले शिष्य श्री नरहरी तीर्थासह मंगळूर मठात चातुर्मास व्रत आचरण केले. श्री द्वारकानाथ तीर्थांनी इ.स. १९४८, १९४९ व १९७२ असे तीन चातुर्मास या मठवास्तुत केले. २३वे गुरुवर्य श्री विद्याधिराज तीर्थांनी मठाच्या मागील बाजूस असलेल्या जागेत श्री द्वारकानाथ सभामंडंप बांधून ०६-०९-१९८१ रोजी त्याचे उद्घाटन केले. तसेच २३-११-१९९१ रोजी मठवास्तूत नवग्रहांची स्थापना केली. ३०-०१-१९९१ रोजी मठवास्तुच्या दर्शनी भागाचे नूतनिकरण केले व १९९२ साली चातुर्मास व्रताचरण केले. २०१६ साली स्वामिजींनी याच मठवास्तुत आपल्या सुवर्ण चातुर्मासाचे व्रताचरण केले.
मंगळूर मठवास्तुची खासियत म्हणजे बांधकामा साठी लागणारे सामान गोव्यातून समुद्रमार्गे बोटीने नेले. तसेच शिल्पकार ही गोव्याचेच होते.