३ जीवोत्तम मठ, गोकर्ण
संस्थापक : श्री जीवोत्तम तीर्थ (३)
स्थापना वर्ष : शके १४६७ विश्वावसु, (१५४५) कोटीतीर्थाजवळ
देव प्रतिमा : श्री भूविजय विट्ठल (पंचलोह) श्री जीवोत्तम तीर्थ स्वामीजींनी गंडकी यात्रेतून आणलेले.
नूतनीकरण
आणि स्थलांतर : श्री रामचंद्र तीर्थ (६) यांनी सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित केले.
नूतनीकरण : श्री लक्ष्मीनाथ तीर्थ (१६) १८११ मध्ये
इतर प्रतिमा : १८१३ मध्ये श्री लक्ष्मीनाथ तीर्थ (१६) मठाच्या समोर मारुतीचे गोपूर मंदिर.
: गरूड, हनुमंत (पाषाण मूर्ती)
द्वारपाल : जय विजय (लाकडी रंगवलेले)
वृंदावन : १) श्री पुरुषोत्तम तीर्थ (४) शके १५१० सर्वधारी, मार्गशीर्ष वद्य २.
: २) श्री कमलाकांत तीर्थ (१२) शके १६७९ ईश्वर, पुष्य शुक्ल ८.
शिखर कलश : श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजी (२३) द्वारे सोन्याचा मुलामा असलेला शिखर कलश प्रतिष्ठा
एकूण क्षेत्रफळ : ९५०० चौ.मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, संध्यामंडप, अग्रशाळा, हनुमान गोपूर, गुरु भवन, अर्चक निवास.
पंचपर्व उत्सव : वनभोजन - कार्तिक पौर्णिमा, प्रतिष्ठा वर्धंती
मठ परंपरेचे तिसरे गुरुवर्य श्री जीवोत्तम तीर्थ यांनी हिमाचल क्षेत्राची तीर्थयात्रा करून परतताना गोकर्ण क्षेत्राला भेट दिली आणि भटकळ येथील वडेर मठात पोहोचले. पूर्वी वडेर मठाच्या कोटितीर्थाजवळ एक वास्तु होती. अष्टमठामधील एक, सोंदे मठाधीश या वास्तूत काही काळ वास्तव्यास राहिले आणि नंतर त्यानी वेगळी जागा घेतली, तरी, कोटितीर्थाची जागा आपली असल्याचा दावा केला. खटला कोर्टात गेला आणि ती जागा वडेर मठाच्या मालकीची असल्याचा निकाल कोर्टने दिला. आपली जमीन परत मिळवल्याच्या स्मरणार्थ, श्री जीवोत्तम तीर्थांनी त्या वास्तुंत विठोबाची मूर्ती स्थापन केली, जी त्यांना त्यांच्या परतीच्या मोहिमेवर सापडली होती. अशा प्रकारे गोकर्णात एका शाखा मठाची स्थापना झाली. ज्या काळात रेल्वे बसेस नव्हत्या त्या काळांत काशी क्षेत्रांत प्रवास करू न शकणारे सामान्य लोक त्यावेळी दक्षिण काशी म्ह्णुन प्रसिद्ध असलेल्या गोकर्णाला जात असत. मठात वाढत्या गर्दीमुळे ती जागा अपूरी होत असल्याने एक नवीन प्रशस्त मठ उभारण्यात आला.
भटकळ हे पश्चिम किनार्याअवरील एक प्रसिद्ध बंदर होते, जे विजयनगर काळापासून माल आयात करत होते आणि तांदूळ, साखर आणि मसाले यांसारख्या देशांतर्गत वस्तूंची निर्यात करत होते. ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच व्यापार करत होते. पोर्तुगीजांनी भटकळमध्ये स्वतःची वसाहत स्थापन केली आणि गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत राज्य केले. १५१० पासून, स्थानिक मुस्लिम व्यापारी आणि पोर्तुगीज व्यापारी, व्यापार विवादांमध्ये गुंतलेले होते. १५१६ मध्ये झालेल्या भांडणात, स्थानिक व्यापाऱ्यांनी २४ पोर्तुगीजांना ठार मारले आणि त्यांचा माल लुटला. १५१८ मध्ये जेव्हा भटकळच्या अधिकाऱ्याने पोर्तुगीजांना खंडणी देण्यास नकार दिला तेव्हा पोर्तुगीजांची तीन जहाजे सैन्य समवेत आली आणि त्यांनी भटकळ बंदरात येणा-या व्यापारी जहाजांना रोखले. तडजोड करणाऱ्या भटकळ अधिकाऱ्याने नेहमीचा कर दिला. आणि मग पुढची २० वर्षे निघून गेली. त्यानंतर १५४२ मध्ये, भटकळच्या राणीने पुन्हा खंडणी देण्यास नकार दिल्यावर, गोव्याचे राज्यपाल मार्टीन अफोंसो डिसोझा यांनी १४०० योद्धांसह दोन जहाजांवरून भटकळ बंदर ताब्यात घेतले. त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली. व्यापारा मुळे होणारी लुटमार, भांडण-तंटे अशा भितिच्या आणी असुरक्षित वातावरणा पासून शांतता मिळावी या उद्देशाने श्री जीवोत्तम् तीर्थांनी शांत व रम्य आशा नजदीक असलेल्या पवित्र गोकर्ण क्षेत्रांत मठ स्थलांतर केले