श्रीमद् रमाकांत तीर्थ
जन्मस्थळ : लोलये
दीक्षागुरु : श्री लक्ष्मीकांत तीर्थ
शिष्यस्वीकार : श्री कमलाकांत तीर्थ
महानिर्वाण : श्रिशके १६७२ प्रमोद संवत्सर मार्गशीर्ष शु १दा (२९-११-१७५०)
वृंदावन स्थळ : श्री वीरविट्ठल मठ अंकोला
गुरुपीठकालावधी : ४३ वर्षे ०० महिने ०३ दिवस
श्रीरमाकांततीर्थांचा उल्लेख असलेले जे कागदपत्र दप्तरात आहेत त्यापैकी पहिला शके १६२९ चा असून शेवटचा १६७२ चा आहे. यावरून या आचार्यांची कारकीर्द बरीच वीर्य झाली. हे पूर्वाश्रमीत लोलये गावांतील शेळी या वाड्यावरील आचार्य उपनामक घराण्यातील. काणकोण महालातील आणखी काही ब्रह्मचारी गोकर्ण पर्तगाळी मठाचे पुढे आचार्य झाले. त्यांतील श्रीमद् रमाकांततीर्थ हे पहिले. पर्तगाळी प्रमाणेच अंकोला मठातही त्यांचे वास्तव्य होते आणि अंकोला मठातच शके १६७२ प्रमोद संवत्सर मार्गशीर्ष शु १ या दिवशी ते निर्वाणप्रत झाले.
स्वान्तदोषप्रशान्त्यर्थं शान्तस्वान्तमुपाश्रये ।
लक्ष्मीकान्तकरोद्भूतं रमाकान्तयतीश्वरम् ॥