Taking too long? Close loading screen.
30 Parvari Marathi

३० श्री जीवोत्तम मठ

आल्टो, पर्वरी गोवा ४०३५२१, फोन ०८३२-२२२६३००

संस्थापक : श्री विद्याधिराज तीर्थ (२३)
शिलान्यास : शके १९२० बहुधान्य संवत्सर, मार्गशीर्ष-१५ (०३-१२-१९९८)
उद्घाटन : शके १९२२ विक्रम संवत्सर कार्तिक बहुळा-७ (१८/११/२०००)
एकूण क्षेत्र : ८०२ चौरस मीटर
बांधकाम क्षेत्र : ७७१ चौरस मीटर
इमारतीचा तपशील : सभागृह, भोजन शाळा, स्वयंपाकघर
सभाभवन : श्री द्वारकानाथ सभाग्रह (हवनियंत्रित)

परवरी हे मांडवी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर नव्याने बसलेलें एक उपनगर आहे, गोवा विधान सभेचा नवा प्रकल्प याच उपनगरांत आहे. पणजीत जागा घेऊन मठ बांधण्याची शक्यता कमी होती. त्या दृष्टिने केवळ पणजी वासियांचे नव्हे तर इतर पणजि ते डिचोली पर्यंतच्या परिसरांतील समाजाला सामाजिक व सांस्कृतिक केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी परवरी येथे नवीन मठ बांधण्याचा निर्धार श्रिमद् विद्याधिराजतीर्थ स्वानिजींनी केला आणी अल्पावधिंतच तेथे जीवोत्तम मठाची वास्तु उभी राहिली. त्या नेत्रदिपक वास्तुचे उद्घाटन दि. १८ नोव्हेंबर २०००रोजी श्री स्वामिजिंच्या हस्ते झाले. पणजी-मुंबई हमरस्त्यावर आसलेली ही वास्तु मठाच्या वैभवांत हमखास भर घालीते.