४. श्री जीवोत्तम मठ बसरूर
बस स्टँड जवळ, बसरूर, उडुपि जिल्हा ५७६२११
संस्थापक : श्री जीवोत्तम तीर्थ (३) (श्री जीवोत्तम तीर्थ स्वामीजींचे जन्मस्थान)
स्थापना वर्ष : शके १४७२ साधारण संवत्सर (इ.स. १५५०),
देव प्रतिमा : श्री दिग्विजय विट्ठल (धातूची मूर्ती) श्री जीवोत्तम तीर्थांनी गंडकी यात्रेतून आणलेली
पुनःप्रतिष्ठा : श्री द्वारकानाथ तीर्थ (२२) शके १८९४ परिधावी संवत्सर वैशाख वद्य पंचमी (०२/०६/१९७२)
एकूण क्षेत्रफळ : ९२० चौरस मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, संध्यामंडप, अग्रशाळा, अर्चक निवास, गुरु भवन, पार्किंगसाठी खुली जागा.
सभाभवन : श्री जीवोत्तम सभाग्रह, श्री विद्याधिराज तीर्थ यांच्या हस्ते ०४-०३-२००२ रोजी उद्घाटन
पंचपर्व उत्सव : वनभोजन - कार्तिक शुक्ल चतुर्दशी
मठाच्या परंपरेतील तिसरे गुरुवर्य श्री जीवोत्तम तीर्थ, यांनी आसेतु हिमाचलची यात्रा केली आणि त्यांचे अनुभव तीर्थावळ या काव्य पुस्तकांत लिहिले आहेत. तीर्थयात्रेदरम्यान त्यांना शिला (गंडकी) नदीत तीन मूर्ती सापडल्या. त्यापैकी एक गोकर्ण कोटितीर्था जवळचा मठ जीर्णोद्धार करून तेथे स्थापना केली आणि त्याला भूविजय विट्ठल असे नाव दिले. तर दुसरी मूर्ति त्यांच्या मूळ गावी बसरूर येथे नवीन मठ उभारुन स्थापना केली. त्यांचा यात्रेंच्या दिग्विजयाच्या स्मरणार्थ दिग्विजय विट्ठल आसे नाव दिले. वैष्णव मठपरंपरेतील २७ मठांतील ६२७ मठादीशांत जीवोत्तम तीर्थ हे नाव एकमात्र गोकर्ण मठाधीशाना आहे.
मठपरंपरेतील १६ वे स्वामी श्री लक्ष्मीनाथ तीर्थांनी आपला चातुर्मास मठांत केला,व मठाचे नूतनीकरण केले.
मठपरंपरेतील १७ वे स्वामी श्री आनंद तीर्थ व शिष्य पूर्णप्रज्ञ तीर्थ यांशी काशी मठाधीश सुमतींद्र यांच्या समवेत नागरमठाचा प्रवास केला.
मठाचे २० वे स्वामी श्री इंदिराकांत तीर्थांनी मठाचा जीरणोद्धार केला.
श्री शके १८५९ माघ शुक्ल प्रतिपदेला काशीमठाधीश श्री सुक्रतींद्र व गोकर्ण मठाचे 20 वे स्वामी व त्यांचे शिष्य कमलानाथ तीर्थांचो भेट झाली. (०१/०२/१९३८)
श्री विद्याधिराज तीर्थांनी गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी श्री दिग्विजय विठ्ठलाचे तात्पुरता स्धलातर केले. शके १८९४, परिधान संवत्सरांत वैशाख,वैशाख बहुळ पंचमी रोजी (०२-०६-१९७२)श्री द्वारकानाथ तीर्थ स्वमीजींच्या हस्ते पुनःप्तिष्ठा करण्यात आली.
श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजींनी १९९८ साली समोरील व डाव्या बाजूच्या अग्रशाळेचा जीरणोद्धार केला.
श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजींनी १४-१२-२००० रोजी श्री जीवोत्तम सभागृहाचा शिलान्यास केला व ०४-०३-२००२ रोजी त्याचे उद्घाटन केले.