८. श्री मारुती मंदिर ऋशिवन
(रिवण मठ), पो. केपे, रिवण गोवा ४०३७०५
संस्थापक : श्री रामचंद्र तीर्थ (६)
स्थापना वर्ष : शके १५७८ दुर्मुखी (१६५६ इ.स.)
देव प्रतिमा : श्री मारुती (ही शिला प्रतिमा श्री राम लक्ष्मण सीतेसह गोकर्ण मठात मिळाली)
वृंदावन : श्री रामचंद्र तीर्थ (६), शके १५५७ विश्ववसु, वैशाख बहुळ- ३
गुहा : श्री दिग्विजयरामचंद्र तीर्थ (७) यांच्या तपस्ये साठी गुहा
एकूण क्षेत्रफळ : ७५,४७५ चौरस मीटर
बिल्टअप क्षेत्र : ३०० चौरस मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, सभामंटप, अग्रशाळा, अर्चक निवास.
सभाभवन : श्री रामचंद्रतीर्थ सभाग्रह.
पंचपर्व उत्सव : वनभोजन : कार्तिक शुक्ल १४
पुण्यतिथी :श्री रामचंद्रतीर्थ वैशाख, बहुळ-३
परंपरेतील सहावे स्वामी श्री रामचंद्र तीर्थ स्वामिजींना दैवी सूचनेनुसार गोकर्णमठाच्या मागील बाजूस चार पाषाणी मूर्ती सापडल्या. द्रष्टांतात मिळालेल्या निर्देशानुसार त्यातील तीन मूर्ति पर्तगाळ येथे स्थापन करून मठ उभारला पण त्यातील चौथी मारुतिची पाषाणी मूर्ती त्यावेळी जड झालि नसल्याने द्रुष्ठांता प्रमाणे कामधेनुच्या मागे पुढचा प्रवास सुरु झाला. त्याप्रमाणे दुर्गम भागातून प्रवास करीत कामधेनु शांत व निसर्ग रम्य आशा ऋशिवन (रिवण) येथे पोहोचताच कामधेनुने पुन्हा पान्हा सोडला व त्याचवेळी वाहकाना मूर्तीही जड झाली. याच ठिकाणि रिवण येथे १६५६ साली श्री रामचंद्रतीर्थांनी या मुर्तिची स्थापना केली व मठ उभारला.