१८. श्री मुरलीधर मठ
पोस्ट कारवार ५८१३०१ फोन ०८३८२-२२०५८०
संस्थापक : श्री इंदिराकांत तीर्थ (२०)
स्थापना वर्ष : शके १८४५ रुधिरोद्घारी, वैशाख पौर्णिमा (30-04-1923)
देव प्रतिमा : श्री मुरलीधर कृष्ण (पाषाण मूर्ती)
नूतनीकरण : श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजी (२३) यांनी १९७८ (५५वी वर्धंती) अष्टबंध
एकूण क्षेत्रफळ : १४०० चौरस मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, अर्चक निवास,
सभाभवन : श्री इंदिराकांत सभाग्रह. १०/०७/२००१ रोजी श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजींच्या
शुभहस्ते उद्घाटन
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव : वैशाख पौर्णिमा, : पुष्पपूजा : श्रावण, अनंत चतुर्दशी : वनभोजन :
कार्तिक शुक्ल चतुर्दशी
पूर्विच्याकाळी गोव्यातून दक्षिण दिशेकडे प्रवास करताना काळी नदी ओलांडुन कारवार मार्गे जावे लागत असे. श्रीमद् इंदिराकांत तीर्थांच्या काळात संचारा दरम्यान स्वामिजी कारवार येथे रामचंद्र हळदिपुरकर यांच्या घरी मुक्काम करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या पत्नीने कारवार येथिल जागा व हळदिपूर येथील बागायती दानपत्र करून स्वामिजींना दिली. हळदिपूर येथील वाडा आणि त्यांची नारळाच्या झाडाची जमीन मठाला दान केली. श्री इंदिराकांत तीर्थ स्वामीजिंनी इथे श्री मुरळीधर गोपलकृष्ण मूर्तीचा स्थापन करून शाखा मठ उभारला.