२ श्री वडेर मठ भटकळ
वीरविट्ठल रोड भटकळ (उ.क) ५८१३२०, फोन ०८३८५-२२५५३८
संस्थापक : श्री नारायण तीर्थ (१)
(स्थापना वर्ष : शके १३९७ मन्मथ संवत्सर (१४७५ इ.स.)
प्रतिमा : श्री रुक्मिणी, सत्यभामा सहित श्री गोपाळकृष्ण (पाषाण मूर्ती)
शिखर कलश : श्री विद्याधिराज तीर्थ (२३) द्वारे सोन्याचा मुलामा असलेली शिखर कलश प्रतिष्ठा
वृंदावन : १) श्री नारायण तीर्थ (१), शके १४३९ ईश्वर, चैत्र अमावास्या, (१५१७) गोपी नदीजवळ
: २) श्री जीवोत्तम तीर्थ (३), शके १५१० सर्वधारी, भाद्रपद शुक्ल-५ : ऋषी पंचमी, गोपी
नदीजवळ
कार्पेट क्षेत्रफळ : १२०० चौ.मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, संध्यामंडप,अर्चक निवास, अग्रशाळा, गुरु भवन, पाकशाळा,
सभाभवन : श्री नारायण तीर्थ कल्याण मंडप
द्वारपाल : जय विजय (पाषाणी मूर्ती)
इतर प्रतिमा : गरुड हनुमंत (पाषाणी मूर्ती)
श्री नारायण तीर्थ स्वामीजींनी वाराणसी प्रदेशांत प्रथम मठाची स्थापना केली होती, मठ आणि समाज यांच्यातील विद्यमान सामाजिक संबंधांबद्दल कोणतीही स्पष्ट धारणा त्यावेळी नव्हती. मठाच्या स्थापनेमागील प्राथमिक उद्दिष्ट केवळ तीर्थक्षेत्राच्या अग्रगण्य ठिकाणी एखाद्याच्या संप्रदायाची पताका उभारणे आणि दूरप्रदेशांतुन येणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित निवारा प्रदान करणे हे होते. तरीही त्यांच्या महान उपक्रमाने एक नवीन परंपरा सुरू झाली होती त्यामुळे सारस्वत ब्राह्मणांच्या वैष्णव पंथाचा हा प्रारंभिक मठ ठरतो. अशा प्रकारे काशी येथे पहिला मठ स्थापन करून, श्री नारायण तीर्थ स्वामीजी उडुपीला परतले. काही काळानंतर, पूज्य गुरू श्री रामचंद्र तीर्थ स्वामीजी त्यांच्या आजारातून बरे होऊन स्वतःच्या मठात परतले. श्री नारायण तीर्थांना पाहून गुरुस्वामी गोंधळात पडले. त्यांची द्विधा मनस्थिथी झाली. उडुपी द्रविड ब्राह्मणांची इच्छा होती की त्यांनी श्री नारायण तीर्थांना दिलेला पीठावरील अधिकार रद्द करावा; ज्याने आपल्या तीर्थयात्रेत त्यांची खूप चांगली सेवा केली आणि ज्याने शिष्य म्हणून दीक्षा घेतली त्या वाराणसीच्या पवित्र प्रदेशात आपल्या वैभवाची पताका लावलेल्या वटुच्या मूल्यांची त्यांना स्वतःला जाणीव होती. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून, पूज्य गुरुवर्यांनी श्री विद्यानिधि तीर्थांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून पट्ठाभिषेक केला आणि श्री नारायण तीर्थ यांना गौड सारस्वत ब्राह्मण समाजाला संघटित करण्याचा आणि एक वेगळी मठ परंपरा निर्माण करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्री नारायण तीर्थ भटकळ येथे आले आणि तेथे मठाची उभारणी करून परशुराम भूमीतील सारस्वत समाजामध्ये धर्म प्रसारणास सुरुवात झाली. यावेळी भटकळ हे केळदी राजवटीत होते. केळदी राज्यकर्त्यांनी श्री नारायण तीर्थांना गुरु म्हणून स्वीकारले आणि "वडेर" या उपाधीने सन्मानित केले. म्हणून पुढे आपल्या गुरू परंपरेला श्री नारायण तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींसारखी वडेर ही पदवी आहे.