७. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठपर्तगाळी, पोस्ट पैंगिण, काणकोण गोवा ४०३७०२ फोन ०८३२-२६३३१८३
संस्थापक : श्री रामचंद्र तीर्थ (६)
स्थापना वर्ष : शके १५७८ दुर्मुखी (१६५६ इ.स.)
देव प्रतिमा : श्री राम, सीता, लक्ष्मण (पाषाण मूर्ती)
उत्सव प्रतिमा : श्री राम, सीता लक्ष्मण (धातूची मूर्ती)
परिवार देवता : श्री मुख्यप्राण (गोपूर मंदिर), गरुड, हनुमान, ब्रह्मा
वृंदावन : १) श्री श्रीकांत तीर्थ (१३), शके १७०८ प्रभव, आषाढ शुक्ल ९
: २. श्री आनंद तीर्थ (१७), शके १७५० सर्वधारी, श्रावण शुक्ल-९
: ३. श्री पूर्णप्रज्ञ तीर्थ (१८), शके १८०१ ज्येष्ठ शुक्ल ९
: ४. श्री पद्मनाभ तीर्थ (१९) शके १८१४, आषाढ शुक्ल ७
: ५. श्री इंदिरकांत तीर्थ (२०) शके १८६४ चैत्र बहुळ ७
: ६. श्री कमलनाथ तीर्थ (२१) शके १८६५ सुभानु चैत्र शुक्ल १२
: ७. श्री द्वारकानाथ तीर्थ (२२) शके १८९४ परिधावी फाल्गुन बहुळ ६
: ८ श्री विद्याधिराज तीर्थ (२३) शके १९४४ प्लव आषाढ शुक्ल -१०
रथ : ४ लाकडी रथ
रथ बिदी : २०० मीटर लांब ५० मीटर रुंद
महाद्वार : राष्ट्रीय महामार्ग १७ कारवार पणजी रोडवरील महाद्वार
शिबिका : २ चांदीच्या पालखी, १ चांदीची लालखी
ध्वजस्तंभ : २२ फूट ४ इंच पाषाणी एकदगडी कूर्म पीठासहित.
शिखर कलश : सोन्याचा मुलामा
गोशाळा : ६०+ गुरे
ग्रंथ भांडार : जुनी दुर्मीळ वैदिक पुस्तके
पुरस्कार : उत्कृष्ट सारस्वता साठी दरवर्षी विद्याधिराज पुरस्कार २५,०००/- रोख पारितोषिक +
मानचिन्ह, + मानपत्र)
पुरस्कार : जीएसबीसाठी दरवर्षी जीवनोत्तम पुरस्कार (१० हजार रोख + करंडक + मानपत्र)
नदी : समुद्रगामिनी इशन्यप्लवा कुशावती
पवित्र वृक्ष : अश्वथ, वट, धात्री, शमी, पारिजात इ.
इमारतीचा तपशील : गर्भगृह, स्वामीजींचे निवासस्थान, अग्रशाळा, अर्चक निवास, सभागृह, पाठशाळा, खोल्या,
ग्रंथालय, संग्रहालय, गोशाळा, कार्यालय, इ.
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव -चैत्र शुक्ल द्वितीया, : वनभोजन : कार्तिक पौर्णिमा, सांगोड (जलविहार) :
कार्तिक बहुळ प्रतिपदा
परंपरेतील सहावे स्वामी श्री रामचंद्र तीर्थ स्वामिजींना दैवी सूचनेनुसार गोकर्णमठाच्या मागील बाजूस चार पाषाणी मूर्ती सापडल्या. या मुर्ती स्थापण्या विषयी विचार करत असतानाच त्याना द्रष्टांत झाला त्यानुसार या मूर्ति घेऊन उत्तर दिशेकडे निघण्याची सूचना मिळाली व जिथे या मूर्ती जड होतील त्याच ठीकाणी त्या मूर्तिची स्थापना करण्याचा संकेत मिळाला. त्याच सूचनेप्रमाणे मूर्ति घेऊन प्रवास सुरु झाला. श्रीक्षेत्र गोकर्णहून खडकाळ भागातून प्रवास करत रात्री पैंगीण (पैंगी आश्रम) येथे पोहोचले तेव्हा मूर्तीवर जड झाली. पण पाण्याची सोय नसलेल्या त्या ठिकाणी मठ कसा बांधायचा असा प्रश्न त्यांना पडला. त्याच रात्रि परत संकेत मिळाले त्याप्रमाणे दुस-या दिवशी सकाळी एक कामधेनु समोर येणार तिची पूजा करा आणि योग्य स्थान दर्शविण्यासाठी प्रार्थना करा. कामधेनु जिथे पान्हा सोडेल त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करावी. दुसऱ्या दिवशी पहाटे एक कामधेनु प्रकट झाली, तिची पूजा करून प्रार्थना केली व तिचा मागोमाग प्रवास सुरु केला. कुशावती नदीच्या काठावरील सुंदर व रम्य परिसरात समुद्र गामिनी ईशान्यप्लवा नदी तिरावर पोहोचताच कामधेनुने पान्हा सोडला, त्यावेळि मुर्ति वाहकाना मुर्ति जड वाटु लागली. याच पर्वतकानन ठिकाणी म्हणजेच पर्तगाळी येथे श्रीरामचंद्र तीर्थांनी श्री राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती स्थापित केल्या. अशाप्रकारे क्रि.श. १६५६ साली श्री रामचंद्र तीर्थ स्वामीजींनी पर्तगाळी मठाची स्थापना केली.