श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

श्री श्रीकांत तीर्थ

जन्मस्थळ : पैंगिण गावांतील महालवाडा
दीक्षास्थळ : पर्तगाळी मठ
दीक्षागुरु : श्री कमलाकांत तीर्थ (१२)
शिष्यस्वीकार : श्री भूविजयरामचंद्र तीर्थ (१४)
महानिर्वाण : श्रीशके १७०८ पराभव संवत्सर आषाढ शुक्ल नवमी मंगळवार (०४-०७-१७८६)
वृंदावन स्थळ : पर्तगाळी मठ
गुरुपीठकालावधी : २८ वर्ष ०५ महिने १८ दिवस

श्रीकांततीर्थ हे श्रीकमलाकांततीर्थांचे शिष्य. पैंगीण येथील महालवाड्यावरील भटभुते या कुळात त्यांचा जन्म झाला होता. गुरूंनी त्यांना पर्तगाळ मठात आश्रम दिल्याची नोंद आढळते.
यांच्या कारकिर्दिंतील शके १६८७ ते १६९८ पर्यंतचे कागतपत्र मठाच्या दप्तरांत उपलब्ध आहेत. शके १६८७ आषाढ शुद्ध १५ला श्रीकांततीर्थांनी लिहिलेले एक आज्ञापत्र उपलब्ध आहे. या आज्ञापत्रावरून गोकर्ण येथील मठाचा जीर्णोद्धार करायचे स्वामिजिंच्या मनात होते. “श्रीमठ (गोकर्ण येथील) बहुत जीर्ण झाला आहे. जीर्णोद्धार करायला पाहिजे. त्यास द्रव्यानुकूलता बिना कार्य होत नाही. याकरिता तुमास लिहिले आहे तर आपण शक्ति मिरऊन विशेष प्रकारे द्रव्यानुकूलता करून पाठविणे …. “ असा मुख्य मजकूर आसलेली आज्ञापत्रे सर्व भक्त मंडळिना पाठविली.
शके १६९२ मध्ये श्रीकांततीर्थ स्वामी आजारी होते. “समस्थ शिष्यवर्ग सासष्ट, अंत्रूज, कोंकण देशीयविद्वैदीक ब्राह्मण समस्त महाजन गोमांत याच्यातर्फे कांही निवडक मंडळींनी कर्तीक कृ. २ शके १६९२ या दिवशी एक विनंतीपत्र लिहून स्वामींच्या तब्येतीविषयी चौकाशी केली आहे. त्यांना आराम पडावा म्हणून देवाचा प्रसाद घेतला आहे आणी “स्वामिजिंचे तपोबले, आरोग्य यास कांही संदेह नाही” असा विश्वास व्यक्त केला आहे.
या सुमारस श्रीस्वामी तापाने आजारी होते ही गोष्ट खरी आहे. या वेळी शिष्यस्वीकार केला नव्हता, त्यामुळे देवपूजा कोणत्याही परिस्थितीत स्वामिनीच करणे भाग होते. त्रिकाळ पूजा स्नान करणे तर भागच. आशा वेळी देवपूजेच्या वेळी स्वामी आपला ज्वर दंडावर स्थापन करून देवपुजा करीत. त्यावेळी दंड थाड थाड उडु लागे. आणी हे दिव्य करून स्वामी देवपूजा करून पुन्हा ज्वराचा सर्वांगात शिरकाव करीत. आजही कुणाचा ताप हटत नसल्यास स्वामिच्या समाधीपुडे नवस बोलतात.
परंतु गोकर्ण मठाचा काहीप्रमाणात जीर्णोध्दार या आचार्यांनी केला असे दिसते. कारण पुढे फक्त ४४ वर्षांनी सोळावे आचार्य श्री लक्ष्मीनाथतीर्थ यांनी आजच्या गोकर्ण मठाचा जीर्णोध्दार केल्याचा शिलालेखाद्वारे पुरावा आहे.
श्री श्रीकांत तीर्थ आजारांतून बरे होऊन लगेच मुंबईला गेले. कारण वेदमूर्ती राजश्री श्रीकांततीर्थ श्रीपाद हे बंदर गोवे तेथून जंजिरे मुंबई येथे जात असून बरोबर पालख्या दोन. त्यास रहदारी … मुजाहीम व होणे सुखरूप … देणे. तटी पार करीत जाणे … जणीजे’ असा हुकुम ठीकठीकाण्याच्या अंतराच्या चौकीदार, ठाणेदार ई. अंमलदारास “श्री राजाराम नरपति हर्ष निधान माघव राव बल्लाळ प्रधान यांनी सहीशीक्क्यानिशी दिला आहे. दि.१३ डिसेंबर १७७० चा हा हुकुम आहे. माधवराव बल्लाळ प्रधान म्हणजे थोरले मधवराव पेशवे हे उघडच आहे.
शके १६९५ वर्षी कुंभकोणम् मठाचे श्री वरदेंद्र तीर्थ स्वामी यांचे गोकर्ण पर्तगाळी मठाधीश श्री श्रीकांत तीर्थ यांस वैशाख शु २ये रोजी लिहलेले एक पत्र आहे. या पत्रात श्री वरदेंद्र तीर्थ नमस्कारपूर्वक श्रीकांत तीर्थांस लिहितात की “आम्ही संचारात आहोत, आपला काही समाचार नाही असे होऊ नये. सोबत अनंताचार्याकडे श्री फलगंदप्रसाद व शाल पाठविली आहे. स्वीकार व्हावा. तुर्त भुवनपति संस्थानाशी द्रोह करून गेला आहोत. व्यवहार करू नये.”
श्री श्रिकांत तीर्थ गुरुवर्य यानी१७०८ वर्षी पर्तगाळी मठातच आषाढ शुक्ल ९ मीस समाधी घेतली असे गुरुपरंपरामृतावरून कळते. पर्तगाळी मठात समाधी घेतलेले हे पहिले आचार्य होते. त्यांचे वृंदावन स्मारक मठात बांधलेले आहे.

श्रीकान्तचरणाम्भोजभृङ्गं निःसङ्गमानसम् ।
श्रये श्रिकान्तयोगीशं विषयासङ्गसिध्यये ॥

Taking too long? Close loading screen.