४ श्रीमद् पुरुषोत्तम तीर्थ
दीक्षागुरु : श्री जीवोत्तम तीर्थ
दीक्षास्थळ : भटकळ
गुरुपीठारोहण : १५१० भाद्रपद
शिष्यस्वीकार : श्री अणुजीवोत्तम तीर्थ
महानिर्वाण : १५१० सर्वधारी संवत्सर मार्गशिर्ष कृष्ण द्वितीया सोमवार (०५/१२/१५८८)
वृंदावन स्थळ : गोकर्ण, ब्राह्मणांचि रुद्रभूमी.
गुरुपीठकालावधी : ३ महिने ०८ दिवस
ग्रंथरचना : १. कर्मसिद्धांत २. संन्यासपद्धती.
स्वामीजींचा इतिहास
कर्मसिद्धान्तसंन्यासपद्धत्यादिकृतं गुरुम् ।
श्रये श्रौतादिधर्मोपदेष्टारं पुरुषोत्तमम् ॥
श्रीजीवोत्तमतीर्थांचे शिष्य श्री पुरुषोत्तमतीर्थ. भटकळ येथेच श्रीजीवोत्तमतीर्थांनी त्यांस आश्रम दिला व गुरूंच्या निर्वाणानंतर शके १५१० या वर्षी भाद्रपद मासात त्यांस पट्टाभिषेक करण्यात आला. हे आचार्य कर्मकांडाबद्दल जागरूक होते. नित्यनैमित्तिक कर्माचा ह्रास होऊ नये व श्रौतस्मार्तकर्मे स्वकीय ब्राह्मणवर्गाने विधिपूर्वक करावी म्हणून त्यांनी 'कर्मसिध्दांत' नांवाचा ग्रंथ लिहिला. तसेच 'संन्यासपध्दती' नांवाचा आणखी एक ग्रंथ लिहिला. श्री पुरुषोत्तम तीर्थांनी श्री आणुजीवोत्तम नामक शिष्याना आश्रम दिला आणि श्री पुरुषोत्तम तीर्थांनी १५१० सर्वधरी संवत्सर मार्गशीर्ष वद्य २ या दिवशी गोकर्ण येथेच समाधी घेतली.