५ श्री अणुजीवोत्तम तीर्थ
दीक्षागुरु : श्री पुरुषोत्तमतीर्थ (४)
शिष्यस्वीकार : श्री रामचंद्र तीर्थ (६)
महानिर्वाण : शके १५५९ ईश्वर संवत्सर कार्तीक वद्य ७मी रविवार (०८-११-१६३७)
वृंदावन स्थळ : श्री व्यासाश्रम डिचोली गोवा
गुरुपीठकालावधी : ४९ वर्ष सुमारे
मठस्थापना : श्री व्यासाश्रम डिचोली गोवा (४था मठ)
स्वामीजींचा इतिहास
शान्तिमन्तमहं वन्दे दान्तिमन्तं निरन्तरम् ।
कामितार्थप्रदातारमणुजीवोत्तमं गुरुम् ॥
श्रीजीवोत्तमतीर्थांच्या नंतर त्यांचे शिष्य श्री पुरुषोत्तमतीर्थांना भाद्रपद मासांत पट्टाभिषेक झाला आणि लगेच श्री अणुजीवोत्तम तीर्थांना शिष्य म्हणुन स्वीकार केला. मार्गशीर्ष महिन्यात श्री पुरुषोत्तम तीर्थांचे महानिर्वाण नंतर शके १५१० यावर्षी वर्षी त्यांचा पट्टाभिषेक झाला.
श्रीमद् अणुजीवोत्तमतीर्थांच्या कारकीर्दीत पोर्तुगीज प्रदेशाला वेढून राहिलेल्या गोव्यात श्रीमद् अणुजीवोत्तमतीर्थांनी माध्वसंप्रदायाचा प्रसार करुन गोकर्णपासून दूर असलेल्या प्रदेशात डिचोली येथे ते एक उपमठ बांधू शकले. स्वकीय शिष्यवर्गाच्या अभावी ही गोष्ट घडणे कठीण. म्हणूनच या काळात उर्वरित गोव्यात वैष्णव संप्रदायाचा बराच प्रसार झाला. श्रीमद् अणुजीवोत्तमतीर्थांनी गोव्यात संप्रदायाचा खूप प्रसार केला. सुमारे ५० वर्षे इतका दीर्घ काळ ते गोकर्ण मठाच्या गादीवर होते आणि गोव्यात बराच काळ संचार करीत. डिचोली मठांतही ते वास्तव्य करीत. अणुजीवोत्तमतीर्थ स्वामींनी श्री रामचंद्र तीर्थांना शिष्य स्वीकार करुन शके १५६० च्या कार्तिक वद्य ७ ला डिचोली येथे समाधी घेतली.